
अमळनेर:- ३५ व्या किशोर किशोरी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील मारवड येथील फ्रेंड्स कबड्डी संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बबनभाऊ बाहेती कॉलेज येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ३५ वर्षानंतर तालुक्यातील संघाने पारितोषिक पटकावले असून खेळाडूंनी अमळनेर तालुक्याचे नाव उंचावले आहे. या संघात पियुष वानखेडे (कर्णधार), दर्शन सुर्वे, मोहित चव्हाण, लोकेश झंवर, सागर चव्हाण, नयन पाटील, सार्थक पाटील, संकेत पाटील, यश पाटील, चेतन खंबायत, चेतन पाटील यांचा असून सर्व खेळाडूंना प्रशिक्षक करण साळुंखे याचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वामी स्पोर्ट्स रावेर, द्वितीय क्रमांक कैलास क्रीडा मंडळ जळगाव तर तृतीय क्रमांक फ्रेंड्स क्लब मारवड यांनी पटकावला. या विजयाबद्दल सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




