80 फुटी रस्ता करताना मा.नगरसेवक प्रताप शिंपीच्या विनंतीमुळे निघाला मार्ग
अमळनेर -शहरात नविन 80 फुटी रस्ता करताना माजी नगरसेवक प्रताप शिंपीच्या विनंतीमुळे आमदार अनिल पाटील यांनी सोईचा पर्याय काढत असंख्य गोरगरिबांना मोठा दिलासा दिला असून यामुळे विकास तर झालाच मात्र गरिबांचे नुकसान देखील टळले आहे.
शहरात 80 फुटी रस्ता हा मुंदडा नगर कडून ते ओम शांतीनगर पासून बाळासाहेब ठाकरे चौक ते मरी माता मंदिर पर्यंत होणार होता, मात्र ओम शांती नगर परिसरात हात मजुरी कारणाऱ्यांनी काबाड कष्ट करून घरे बांधली आहेत.रस्त्यामुळे या लोकांचा संसार उघड्यावर येणार होता परंतु माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली,आमदारांनी त्यांचे निवेदन तात्काळ स्वीकारून तो रस्ता दुसऱ्या मार्गाने वळवून विकास तर केलाच परंतु गरीब कष्टकऱ्यांचे घराला कुठल्याही प्रकारे नुकसान न करता ते कार्य सिद्धीस नेले.सदर कार्याबद्दल मुंदडा नगर परिसरातील सर्व नागरिकांनी आमदार पाटील व प्रताप शिंपी यांचे आभार व्यक्त केले आहेत.




