
दहिवद माध्यमिक शाळेत भरला ४३ वर्षानी दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
अमळनेर :- तालुक्यातील दहिवद येथील नवभारत विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा नासिक ग्रामीण येथील पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांचे संकल्पनेतुन रविंद्र मोरे , कैलास महाराज , विजय वाणी यांचे प्रयत्नातुन संपन्न झाला.स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक श्री. यू.ओ. चौधरी सर होते तर प्रमुख अतिथी
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई वासुदेव पाटील, संस्थेचे चेअरमन श्री जयवंत पाटील,संस्थेचे सचिव श्री सुभाष पाटील, मुख्याध्यापक श्री आसाराम सैदाणे होते.तत्सम कालावधीतील सर्व सेवानिवृत्त गुरुवर्य श्री. यू ओ. चौधरी सर , श्री जे.बी.शेलकर सर,श्री बी. एन.लोहार सर ,श्री बी. ए.लांबोळे सर, श्री. ए. बी.पाटील सर,श्री गुलाबराव बोरसे सर तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री रामकृष्ण सुतार, श्री आनंदा बापू पाटील यांचा पुष्पहार शाल ,श्रीफल ,स्मृतिचिन्ह व ड्रेस-साड़ी कपड़े देवून यथोचित सत्कार वासुदेव देसले यांनी केला.
माजी विद्यार्थीनी सुरेखा पाटील बड़ौदा, सौ. रत्नप्रभा सोनार कल्याण ,सौ प्रतिभा देशमुख ठाणे , सौ अनुपमा कांकरिया धुळे, सौ राजश्री अढ़ाले जळगांव यांचाही “माहेर ची साड़ी “शाल श्रीफल पुष्पहार ताम्र दीप , व स्मृति चिन्ह भेट देवून सौ सुषमाताई वासुदेव पाटील यांनी सत्कार केला ,४३ वर्षानी पुन्हा एकत्र विद्यार्थी व शिक्षक आले याचा मनस्वी आनंद तर होताच परंतु काही गुरुवर्य विद्यार्थ्याना सोडून गेले म्हणून कार्यक्रमाच्या सुरवातीस दिवंगत गुरूंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.नवभारत विद्यालयाचे सचिव श्री. सुभाषराव हिम्मतराव पाटील यानी संस्थेच्या वतीने शाळेचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नति झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफल देवूंन सत्कार केला. सर्व माजी विद्यार्थी ४३ वर्षानी आमच्या शाळेत पुन्हा एकत्र आले म्हणून सर्वांचे कौतुक व आभार मानले.सर्व शिक्षक विद्यार्थी यानी ४८ वर्षापूर्वीचे आठवनीना उजाळा दिला, चौधरी सर व लाबोळे सर यांनी पुन्हा वर्गात जावुन माजी विद्यार्थी यांना शिकविले ,विद्यार्थी जे सेवानिवृत झाले तेही वर्गात बसुन चौधरी सर यांनी ४३ वर्षापूर्वी शिक़वलेले गणित आठवणीत आणले.वर्गात माजी विद्यार्थी म्हणून- पोलिस उप अधिक्षक वासुदेव देसले , ह भ प कैलास पाटील,प्रा.रवींद्र मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेन्द्र पाटील ,संजीव प्रतापराव सोनवने,मुख्याध्यापक धनंजय खंडेराव सूर्यवंशी, विजय भाऊराव पवार,रवींद्र विश्वनाथ महाजन,सेवानिवृत जवान कैलास दगड़ू माळी, सेवानिवृत्त पोलिस हवालदार रोहिदास सोनवने,सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विजय वाणी,सेवानिवृत सचिव रमेश पोपट अहिरे तसेच आदर्श शेतकरी नागरिक राजेंद्र राजधर पाटिल, राजेंद्र धोंडू पाटील ,राजेंद्र डोंगर पाटील , कैलास बोरसे , शांताराम सुकलाल माळी, गोकुल काशीनाथ पाटील,शिवाजी विश्राम पाटील ,पंडित राजेन्द्र पद्माकर मांडे , विश्वासराव पाटिल, अकबर चांद खाटिक,हे हजर होते. स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी वासुदेव देसले रविंद्र मोरे , कैलास पाटील , विजय वाणी , राजेन्द्र पाटील यानी विशेष प्रयत्न केले व् संस्थेचे चेअरमन यांनी सहकार्य केले.




