
अमळनेर:- येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने वार्षीक सर्वसाधारण सभा,भव्य शेतकरी सभासद सन्मान सोहळा व विविध विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी जितेंद्रसिंह रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तर्फे पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री धुळे मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुर्नवसन आ.अनिल भाईदास पाटील हे असतील तर जळगांव लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांचेसह मान्यवरांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून असेल. याप्रसंगी शेतकरी सभासद बांधवांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी शिवजयंतीच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांचे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर शिव व्याख्यान होणार आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती,अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रितांना उपस्थितीचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील ,उपसभापती सुरेश पिरन पाटील व सन्माननिय संचालक मंडळ तसेच सचिव यांनी केले आहे.




