
अमळनेर:- अमळनेर करांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिर या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी झाली.
सामाजिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारा अमळनेर रक्तदान चळवळीत लौकिक मिळवलेला युवा मित्र परिवारातर्फे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत नाट्यगृह परिसरात युवकांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सालाबादप्रमाणे यंदाही भव्य दिव्य मिरवणूक विविध पारंपारिक कलापथकांच्या सहभागाने आकर्षक ठरली होतो . शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.अमळनेर नगरपरिषद हायस्कूलच्या मैदानातून सदर मिरवणुकीस मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली.यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेरकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. सदर मिरवणुकीत सायरदेवी बोरा स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळकरी मुलांचे पथनाट्य व देखावा लक्षवेधी ठरला तर रमाई लेझीम महिला पथक,वाडी संस्थांचे बाल भजनी मंडळ, जीत स्टुडिओ चे नृत्य, वृक्षवल्ली फाउंडेशन शिवप्रेमीचे लक्ष वेधून घेत होते. सदर मिरवणुकीतील भव्य असा शिवजयंतीचा देखावा व बाल शिवाजी सजवलेल्या ट्रॅक्टरवर आकर्षक ठरले.
सदर शिवजयंती मिरवणुकीत विजय मारुती मंदिर येथे लाडू वाटप, राज लाड, भावेश जैन, सिद्धू चौधरी, योगेंद्र माळी व तुषार बाविस्कर यांच्या कडून शितपेय लस्सी वाटप झाले. विजय मारुती मंदिर येथे मिरवणूक थांबवून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही शिवजयंती मिरवणुकीस भेट दिली. मिरवणूकी दरम्यान ठिकठिकाणी पिण्याचे पाणी वाटप व्यवस्था करण्यात आली होती.
समारोपप्रसंगी छ शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांच्या परिवाराच्यावतीने सालाबादप्रमाणे शिवभक्तांसाठी शिव भंडारा आयोजित करीत रणरणत्या उन्हात जल्लोष करणाऱ्या शिवभक्तांसाठी यावेळी मठ्ठा वाटपही करण्यात आले.यावेळी शिवजयंती मिरवणुकीत सहभागी कलापथकांचा सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. यासाठी मंगळ ग्रह मंदिर संस्थान यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमासाठी मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा,बिल्डर सरजूसेठ गोकलानी,आदित्य बिल्डर्स चे प्रशांत निकम,ॲड.दिनेश पाटील, कृ उ बा संचालक सचिन पाटील,भिकेश पाटील, यांचे सहकार्य लाभले.




