
अमळनेर :- तालुक्यात आज पासून सुरू झालेल्या परीक्षेचा पहिला मराठीचा पेपर शांततेत पार पडला असून तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
तालुक्यात 11 परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठी तर उर्दू माध्यमाचा उर्दू भाषेचा पहिला पेपर शांततेत पार पडला.तालुक्यातून 3 हजार 183 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते.त्यापैकी 3 हजार 101 विद्यार्थी उपस्थित तर 82 विद्यार्थी गैरहजर होते.यात 7 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर उर्दू माध्यमातून 189 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते.त्यापैकी 183 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 6 विद्यार्थी गैरहजर होते.परीक्षा काळात कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर प्रत्येक परीक्षा केंद्रात बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते.प्रत्येक परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.




