
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनातील उद्घाटन सत्रात उमटला सुर...
अमळनेर:- अमळनेरचे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन हे विद्रोही साहित्य संमेलनाच्या इतिहासातील परमोच्च संमेलन होते असा सूर छत्रपती संभाजीनगर येथिल मलिक अंबर नगरीत संपन्न होत असलेल्या १९ वे विद्रोही साहित्य संमेलनात आजी माजी अध्यक्षांसह वक्त्यांनी उद्घाटन सत्रात व्यक्त केला.
उद्घाटन सत्रात प्रमुख भाषण करताना माजी साहित्य संमेलना अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांनी सांगितले की, अमळनेर येथील विद्रोहीचे संयोजक हे कमी बोलणारे व प्रचंड काम उभे करणारे आहेत.यावेळी अमळनेर येथील १८वे विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, निमंत्रक रणजित शिंदे,समन्वयक प्रा.अशोक पवार यांचा भव्य सत्कार संविधान ,स्मृतिचिन्ह देऊन नूतन संमेलनाध्यक्ष लोकसंस्कृती अभ्यासक डॉ.अशोक राणा,मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे,विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी, यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक दिल्ली येथिल जेष्ठ साहित्यिक मा.कवल भारती, प्रमुख पाहुणे प्रख्यात उर्दू साहित्यिक नुरुल हसनैन, प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे, स्वागताध्यक्ष इंजि.सतिश चकोर, मुख्य निमंत्रक ॲड.धनंजय बोरडे, मा.माजी संमेलन अध्यक्ष डॉ.प्रल्हाद लुलेकर,डॉ.प्रतिभा अहिरे,किशोर ढमाले आदिंसह मोठ्या संख्येने मान्यवर लेखक,वक्ते,विचारवंत साहित्यिक उपस्थित होते.सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण या परिसंवादात अमळनेर येथिल विद्रोही चे संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील हे ही सहभागी असतील.अमळनेर येथील शिव व्याख्याते रामेश्वर भदाणे,अशोक बिऱ्हाडे, किरण बागुल, डी ए पाटील, प्रा.सुनिल वाघमारे,प्रा. कांबळे,संजय पाटील आदिंसह संयोजन समितीचे सदस्य संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनास हजारोंच्या संख्येने साहित्यिक रसिक प्रेक्षक व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.




