
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
मांडळ येथील ग्रामपंचायत सरपंच यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी दि 17 फेब्रुवारी रोजी येथील ग्राम पंचायत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी कविता दीपक बडगुजर यांची एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्याची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जो गौरव यशवंत शिरसाठ आणि काम पाहिले.त्यावेळी तलाठी मधुकर पाटील ,ग्रामसेवक प्रांजल वाघ उपस्थित होत. यावेळी माजी सरपंच व परिवर्तन पॅनल प्रमुख किरण जवरीलाल जैन, माजी सरपंच विद्याबाई विजय पाटील , मीनल सुरेश कोळी , कुसुमबाई भास्कर पाटील, वसंत बळीराम कोळी, उपसरपंच सुनंदाबाई प्रताप पारधी , विजय सिताराम कोळी, हंसराज सुरेश मोरे ,मा. सभापती डॉ दीपक पाटील ,ग्राम पंचायत सदस्य मंगला मंगलदास तुळशीराम कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ अशोक हिम्मतराव पाटील,मा. चेअरमन संतोष पुंडलिक पाटील,मा. चेअरमन पंढरीनाथ विश्राम देसले, काशिनाथ निंबा बडगुजर विजय नथू पाटील ,सुरेश लोटन कोळी ,राजेंद्र अण्णा धनगर (तंटामुक्ती अध्यक्ष ),जितेंद्र पोपट पाटील, नथू भाऊराव पाटील, रावसाहेब पंडित कोळी शेखर यशवंत पाटील, भास्कर चैत्राम पाटील, अरुण संतोष कोळी ,निलेश नारायण बडगुजर , शांताराम सखाराम कोळी ,विकास शांताराम बडगुजर ,वसंत बळीराम कोळी , हिम्मत काशीराम पाटील इत्यादी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर भव्य मिरवणूक काढत आली.गावातील सर्वांगीण विकासाकडे भर दिला जाईल. रस्ते,पाणी, वीज, याकडे लक्ष देऊन गावाचा विकास कसा साधला जाईल याकडे लक्ष देण्यात येईल असे मनोगत नवनिर्वाचित सरपंच कविता दीपक बडगुजर यांनी व्यक्त केले.




