
अमळनेर – अमळनेर कडून शिंदखेडा जाणाऱ्या रस्त्यावर प्रोफेसर कॉलनी जवळ असलेल्या वळण रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून रात्रीच्या वेळेस त्या खंड्याचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात होत असल्याने तो जीवघेणा खड्डा बुजविण्याची मागणी वाहन धारकांकडून होत आहे.
अमळनेर कडून शिंदखेडा जाणाऱ्या महामार्गावर नेहमी मोठी वर्दळ असते. हा महामार्ग नरडाणा,दोंडाईचा,शिरपूर तसेच मध्यप्रदेशात जाणारी वाहने ह्याच रस्त्याने वापरत असतात.शहराच्या मधून जाणाऱ्या ह्या महामार्गावर प्रोफेसर कॉलनी जवळ असणाऱ्या वळण रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून हा खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.त्या ठिकाणी वळण रस्ता असल्याने अंधाऱ्यात ह्या खड्ड्यांचा अंदाज वाहन धारकांना येत नसल्याने वाहनधारक खड्डयात जाऊन आदळतात त्यामुळे नेहमी किरकोळ अपघात होत असतात. तर पावसाळ्यात त्या खड्डयात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने संबंधित विभागाने त्या खड्डयाची दुरुस्ती करून खड्डा बुजवावा अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

