
अमळनेर : सानेनगर येथील बोरी नदी काठावरील सोन्याचा महादेव मंदिरावर महाशिवरात्री निमित्त बारा गाड्या ओढण्याचा ,पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सव संपन्न झाला.
सकाळी सानेनगर व तांबेपुरा भागातून पालखी मिरवणूक व दिंडी काढण्यात आली. सोन्याचा महादेव मंदिरावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सायंकाळी मच्छीन्द्र श्रीराम भगत व भाविकांनी तांबेपुरा भागात विप्रो कंपनीपासून ते शिवशक्ती चौकापर्यंत बारा गाड्या ओढल्या. शेकडो शिवभक्तांनी बारा गाड्यांवर बसण्याचा आनंद लुटला.
त्याचप्रमाणे महादेव मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. यात्रेत खेळणी ,पाळणे , खाद्य पदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. सोन्याचा महादेव दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.




