
कलाविष्णू संस्थेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष आ.अनिल पाटलांचाही सत्कार
अमळनेर-जळगाव जिल्ह्यात प्रथमच झालेल्या पत्रकार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अमळनेर येथील पत्रकारांच्या संघाने उत्कृष्ठ प्रदर्शन करीत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याने सर्व पत्रकार बांधवांचा कलाविष्णू बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने मा.मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच आमदार अनिल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कलाविष्णू संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी सत्कार केला.श्री चौधरी यांनी हा कार्यक्रम मारवड रस्त्यावर आयोजित केला होता.यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा प्रवक्ते योगेश देसले,जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील,रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील,भाजप तालुकाध्यक्ष होरालाल पाटील,कै दयाराम पिराजी शिंदे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे,अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण पाटील,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे,भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या सन्मानानंतर अमळनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड किरण पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.आमदार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार बांधवाच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक करत पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व आपलाही सत्कार केल्याबद्दल कला विष्णू संस्थेचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे तर आभार नरेंद्र चौधरी यांनी मानले. यावेळी टीमचे कर्णधार संजय पाटील व पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी आयोजकांचे आभार मानले.कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.




