
अमळनेर – साई इंग्लिश अकॅडमितर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रतिष्ठेचा ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.इंदिरा भवन येथे झालेल्या या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशपाल पवार (वर्ग 1 राजपत्रित अधिकारी, असिस्टंट कमांडंट) यांनी प्रेरणादायी भाषण केले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.अविनाश जोशी(अध्यक्ष,म. वा. मंडळ, अमळनेर) होते.सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्यामकांत
भदाणे(उपाध्यक्ष, म. वा. मंडळ, अमळनेर), अतुल कोतकर
(म्युच्युअल फंड सल्लागार, संगमनेर) आणि सौ. प्रतिभा मगर (सरकारी वकील, पारोळा) उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. स्वागत गीत मृणाल पाटील हिने सादर केले, तर नेहा पाटील, रिचल पाटील, हिमानी पाटील,कल्याणी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या सोहळ्यात 125 हून अधिक यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले. यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि प्रेरणादायी ‘साई रत्न’ पुरस्कार यशोदीप दीपक पवार, पूनम शितल भारोटे, सनय मिलिंद पाटील आणि सुमित भरत पाटील यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब मगर (संचालक, साई इंग्लिश अकॅडमि) यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रियंका बारी हिने उत्कृष्टपणे पार पाडले. या प्रसंगी विद्यार्थी, पालक
आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




