
अमळनेर:- शेतकऱ्यांच्या असंख्य व गंभीर प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रभर 3 मार्च रोजी (सोमवार) एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचे नियोजन आहे. त्यानुसार अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी, 3 मार्च 25 रोजी, सकाळी 9.30 वाजता अंमळनेर तहसील कार्यालयासमोर, एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहे. तरी तालुक्यातील काँग्रेस प्रेमी सर्व पदाधिकारी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी यांनी केले आहे.




