
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथे शेतात मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळाला एकाने दगड मारून जखमी केल्याने मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनगीर येथील गजमल रामा ठेल्लारी (वय २७) हा २८ रोजी दुपारी १:३० वाजता त्याच्या मालकीच्या मेंढ्या घेऊन सबगव्हाण ते भरवस रस्त्यावर चारत असताना सबगव्हाण येथील भैय्या उर्फ मनोज रोहिदास पाटील हा आला आणि तुम्ही मेंढपाळ कुठेही मेंढ्या चारतात असे म्हणत शिवीगाळ करू लागला. गजमल याने जाब विचारला असता भैय्या याने दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्याला मध्यभागी मारला व शिवीगाळ करून निघून गेला. उपचार घेऊन गजमल याने मारवड पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.




