
गुन्हा दाखल करावा म्हणून रात्री पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन
अमळनेर : छत्रपती शिवराय व संभाजी राजे यांच्या विषयी गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी अमळनेर पोलीस स्टेशन येथे बहुजन समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अमळनेर बहुजन समाजाचे कार्यकर्ते कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. आणि निवेदन घेण्यासही नकार दिला म्हणून घोषणा देत मनोहर निकम, श्याम पाटील, कैलास पाटील , जे. पी. पाटील , सुभाष पाटील , प्रा अशोक पवार, प्रशांत निकम , मनोज पाटील ,बी के सूर्यवंशी , श्याम पवार , भूषण भदाणे ,एस एम पाटील ,तिलोत्तमा पाटील ,माधुरी पाटील , प्रा शीला पाटील , पद्मजा पाटील ,वसुंधरा लांडगे ,महेंद्र पाटील , देवेंद्र देशमुख ,मुख्तार खाटीक ,रियाज मौलाना ,नावेद शेख , रहेमतुल्ला पिंजारी ,ऍड यज्ञेश्वर पाटील ,ऍड दिनेश पाटील, शरद पाटील ,अजय साळुंखे , दीपक काटे ,डॉ कुणाल पवार, महेश पाटील ,विकास पाटील ,योगेश पाटील आदी बहुजन समाज कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला बसले होते. रात्री उशिरापर्यंत दखल न घेतल्याने सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन आवारातच भोजन घेतले.




