
अमळनेर-येथील नगरपरिषदेत मोबाईल द्वारे घेतली जाणारी सफाई कर्मचारी यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंद करावी या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने न प च्या मुख्याधिकारीना देण्यात आले.
यात म्हटले आहे की नगरपरिषद अंमळनेर मध्ये सफाई कर्मचारी यांची मोबाईल द्वारे बायोमेट्रिक्स हजेरी सुरुवात केलेली असून ती थांबविण्यात यावी कारण मोबाईल द्वारे बायोमेट्रिक्स हजेरी घेण्याबाबत शासनाचे कुठलेच कडक सक्तीचे आदेश नाहीत.बहुतांश सफाई कर्मचारी यांच्याकडे मोबाईल नाही. काहींकडे मोबाईल असतो पण त्यांच्याकडे रिचार्ज बॅलन्स नसतो बहुतांश सफाई कर्मचारी मुख्यतः महिला सफाई कर्मचारी अशिक्षित आहेत त्यांना मोबाईल चालवता देखील येत नाही. कधी कधी नेटचा देखील प्रॉब्लेम असतो. सफाई कर्मचारी यांचा पगार दैनंदिन घर खर्चासाठी अपूर्ण पडतो तर तो मोबाईलला रिचार्ज बॅलन्स कसा टाकेल.त्यामुळे सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच आपण किंवा खाते प्रमुख यांनी सफाई कर्मचारी यांना किंवा सफाई कर्मचारी संघटना पदाधिकारी यांना पूर्व सूचना देऊन सदर विषय समजून सांगण्यात आलेला नाही तरी सदर मोबाईल द्वारे घेतली जाणारी बायोमेट्रिक्स हजेरी बाबत सफाई कर्मचारी यांना सक्ती करू नये तसेच सदर हजेरी तात्काळ थांबवुन बंद करण्यात यावी अशी विनंती जनरल सेक्रेटरी किशोर संगीले,अध्यक्ष अनिल बॅंडवाल,उपाध्यक्ष रमेश कलोसे यांनी केली आहे.




