
अमळनेर बाजार समितीच्या भरारी पथकाने केली कारवाई, यापुढे फौजदारी गुन्हा दाखल करणार-सभापतींचा इशारा
अमळनेर-तालुक्यातील पातोंडा येथे विना परवाना अवैध खेडा खरेदी करताना चोपडा येथील व्यापारी आढळून आल्याने अमळनेर बाजार समितीच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली असून यापुढे असे कुणीही आढळल्यास दंडासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सभापती अशोक पाटील यांनी दिला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांच्या कार्यक्षेत्रातील खेडा खरेदीसाठी नेमलेल्या भरारी पथका मार्फत तपासणी केली असता खेडा खरेदी अंतर्गत पातोंडा येथे विना परवाना अवैधरित्या भुसार खरेदी करीत असतांना चोपडा येथील व्यापारी प्रत्यक्ष आढळून आला आहे. सदर व्यापारी यांनी खरेदी केलेल्या मालाचा पंचनामा करुन महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 च्या कायद्यानुसार – दंडात्मक कार्यवाही करुन सदर व्यापा-या कडुन बाजार फीसह दंड वसुल करण्यात आला.तसेच यापुढे कोणताही व्यापारी परस्पर व विना परवाना अवैध खेडा खरेदी करतांना आढल्यास दंडात्मक कार्यवाही अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्वानी नोंद घ्यावी असा इशारा सभापती अशोक आधार पाटील व उपसभापती तसेच सर्व संचालक मंडळाने दिला आहे.




