
गलवाडे रस्त्यावरील घटनेत एक जखमी, गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे ते अमळनेर रस्त्यावर एकाने दारूच्या नशेत दुचाकी भरधाव चालवत स्कुटीला ठोकल्याने एक गंभीर जखमी झाल्याची घटना ५ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडसे रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टर असलेले मच्छिंद्र रतीलाल पाटील (वय ३८) हे ५ रोजी गलवाडे अमळनेर रस्त्यावरील एस्सार पेट्रोल पंपसमोर चहाच्या टपरीवर थांबून अमळनेरकडे जाण्यास निघाले, तेव्हा समोरून येणाऱ्या स्प्लेंडर प्लस (क्रमांक एम् एच १९ बीव्ही ४८५०) वरील चालक विनोद दगडू पाटील (रा. सबगव्हाण) याने दारूच्या नशेत स्कुटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे फिर्यादी मच्छिंद्र यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात स्कूटीचेही नुकसान झाले. मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफखान पठाण हे करीत आहेत.




