
6 रोजी होणार भगवान महादेव शिवलिंग व नंदीश्वर महाराजांची प्राणप्रतिष्ठा
अमळनेर-नव्यानेच निर्माण झालेल्या सुर्यमुखी महादेव मंदिर रामवाडी केशवनगर येथे प्राणप्रतिष्ठा महोत्सव दिनांक 2 पासून सुरू झाला असून गुरुवार दिनांक 6 रोजी भगवान महादेव शिवलिंग व नंदीश्वर महाराज यांच्या मूर्त्यांची प पु संत प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
नव्याने निर्माण होणारे हे अमळनेर शहरातील सर्वात मोठे महादेव मंदिर आहे. दिनांक 2 रोजी श्री शिवलिंग व श्री नंदीश्वर महाराज मिरवणूक राममंदिर ते बंगालीफाईल, आयोध्यानगर, रामवाडी केशनगर पर्यंत वाजतगाजत काढण्यात आली यावेळी महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.3 रोजी पुजा मांडणी तर 4 रोजी पुण्याहवाचन, देवतास्थापन, सायंपुजन झाले तर आज दिनांक 5 रोजी मुर्ति अधिवास, वास्तूप्रवेश, सायं पुजन आदी कार्यक्रम सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहेत.तर फाल्गुन शु.७ दि. ६ गुरुवार रोजी कलशारोहन, स्नपन, हवन, पुर्णाहुति महानैवेदय महाआरती प.पु.संतश्री प्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून हे सर्व कार्यक्रम सकाळी ८ ते १२ या वेळेत होतील.कलशारोहन व ध्वजारोहन प.पु.संत श्री सदगुरु प्रसादजी महाराज यांच्या हस्ते होणार असून
कळसाचे मानकरी प.पूज्य. ह.भ.प. प्रसादजी महाराज आहेत. पिंड व नंदी मूर्तिचे मानकरी येथील उद्योजक तथा माजी नगरसेवक दादा पवार, त्रिशूल मानकरी प्रल्हाद मुरलीधर भावसार तांबेपुरा तर महाप्रसादाचे मानकरी माजी नगरसेवक नरेंद्र विष्णु चौधरी हे आहेत.
सदर कार्यक्रम सुर्यमुखी महादेव मंदिर रामवाडी, केशवनगर,अमळनेर येथे होणार असून महाप्रसाद गुरुवार, दिनांक ६ रोजी संध्याकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी सहपरिवार सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सुर्यमुखी महादेव सेवा समिती व अमळनेर नगरीतील सर्व शिवभक्त यांनी केले आहे.




