
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख आणि ५ मोटारसायकली एक रिक्षासह ३ लाख४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धरणगाव व अमळनेर तालुक्यातील ९ आरोपींविरुद्ध जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू चोरी नंतर परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी अवैध व्यवसाधारकाना मोठा झटका दिला आहे. तालुक्यातील टाकरखेडा येथे मोठा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी केदार बारबोले याना मिळाल्यानंतर त्यांनी ५ रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , एएसआय राजेंद्र कोठावदे , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशीव , निलेश मोरे ,उज्वलकुमार म्हस्के , गणेश पाटील ,अमोल पाटील , सचिन पाटील,राहुल पाटील,उदय बोरसे याना टाकरखेडा येथे पाठवले. समाधान धर्मा पाटील यांच्या गट नम्बर १८० मधील शेतशिवारात शनिमंदिराजवळ पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. पोलिसांनी तेथून प्रकाश भगवान महाजन माळीवाडा धरणगाव , भाईदास सोनू अहिरे रा लोणे अमळनेर, रमेश आत्माराम महाजन रा हनुमान नगर धरणगाव , बापू जगन्नाथ पाटील शिवाजीनगर पैलाड, समाधान धर्मा पाटील टाकरखेडा , शिवलाल धर्मा पाटील टाकरखेडा , विजय पंढरीनाथ सोनवणे रा निशाणे ता धरणगाव , शिवदास प्रकाश धनगर रा नेहरूनगर धरणगाव , धंनजय श्रीराम चव्हाण बोरसे गल्ली अमळनेर याना झन्ना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख व २ लाख२० हजार रुपये किमतीच्या ५ मोटरसायकली आणि १ रिक्षा असा एकूण ३ लाख ४६ हजार ९६० मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आणण्यात आला. अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जुगार अड्ड्यावर धाड पडली. गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




