
अमळनेर : पूज्य सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिव पदी सविता अहिरे (बोरसे) व खजिनदारपदी प्रा मंदाकिनी भामरे यांची निवड करण्यात आली.

महिला दिनाच्या अनुषंगाने मासिक सभेत पतपेढीच्या दोन्ही पदांवर महिलांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मासिक सभेत अध्यक्ष सुशील भदाणे ,उपाध्यक्ष महेश नेरपगारे , संजीव पाटील , माजी अध्यक्ष सचिन साळुंखे , माजी उपाध्यक्ष राजेंद्र पाटील , आशिष शिंदे , प्रमोद पाटील , प्रतिभा जाधव ,संजय पाटील , व्यवस्थापक सागर पाटील, अजय पाटील ,रवींद्र पाटील, स्वप्नील पाटील , विपीन पाटील हजर होते.
या निवडीबद्दल त्यांचे माध्यमिक पतपेढी संचालक तुषार बोरसे , राजेंद्र पाटील ,प्राथमिक शिक्षक संघटनेचे महेंद्र रामोसे ,शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जितेंद्र ठाकूर , मुख्याध्यापक संघटनेचे जे डी अहिरे यांनी सत्कार केला.




