
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आज दिनांक. 8 मार्च 2025 शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी “महिलांचे अधिकार व सुरक्षितता”या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांचे हक्क, कायदे आणि कर्तव्याची माहिती दिली. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो या मागची पार्श्वभूमी सांगितली. महिला आज सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहे. तरी देखील महिला सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांच्या अधिकारासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्हि.डि. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या व्याख्यानातून त्यांनी लिंग समानता, महिलांचे अधिकार, देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने महाविद्यालयातील नेहा भोई, वैष्णवी पाटील, हर्षदा पाटील या विद्यार्थ्यांनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील महिलांचे अधिकार व महिलांची सद्य परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. मुलींनी उच्च शिक्षित होवून देशाची सेवा करावी असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमिन पठाण या विद्यार्थ्यांनीने मानले.कार्यक्रमाचे आभार कु. हर्षदा पाटील हिने मानले.
सदर कार्यक्रमाला श्रीमती मंजुषा गरूड, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा.डॉ.दिलीप कदम, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. विजय पाटील,प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. संजय पाटील , प्रा. डॉ. देवदत्त पाटील, श्री. जगदीश सांळुखे,श्री. सचिन पाटील तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.




