
अमळनेर :- तालुक्यातील जळोद येथील एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

संदीप जगन्नाथ कोळी (वय 29 वर्षे रा.जळोद ता.अमळनेर) याने 10 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बैल बांधण्याचा गोठ्यात नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून वामन शिवलाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




