
अमळनेर– जागतिक महिला दिनानिमित्त लोकमान्य विद्यालय येथील 5 वी ते 9 वीच्या मुला-मुलींसाठी लिंग समानता यावर जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगणा सहेली अमळनेर तर्फे आदरणीय श्री.गोपाळ गुरुजी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान चे विश्वस्त यांचे मार्गदर्शनपर सत्र ठेवण्यात आले.

विद्यार्थ्यांसोबत स्त्री पुरुष समानता यावर चर्चा करण्यात. लोकमान्य विद्यालयचे मुख्याध्यापक मा.मनोहर महाजन सर यांनी मनोगत व्यक्त केले,दिपीका सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका सायली देशपांडे यांनी केले.यावेळी जेष्ठ शिक्षक जे.के.चौधरी सर व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.
तसेच वृक्षवल्ली फाऊंडेशन कडून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमातही विरांगणा सहेलीने उत्साहात महिला दिन साजरा केला.यावेळी अध्यक्षा सौ.दिपीका सोनवणे यांनी मासिक पाळीची भूमिका निभावली,सचिव सौ.कल्पना पाटील यांनी सावित्रीबाई फुले तर सौ.दर्शना गुरव यांनी मल्टि टास्किंग वूमनची भूमिका साकारली. सदर कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुदर्शना पाटील व शोभा पाटील, सौ.राजश्री पाटील,सौ.रोहिणी शिरसाठ,श्रीमती.भारती कोळी, सौ. अपेक्षा पवार,सौ.निलिमा सोनकुसरे व सौ.योगिता पांडे हजर होत्या




