
अमळनेर :- तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत तर्फे दि. ८ मार्च रोजी दुपारी ४ वा. जागतिक महिला दिन निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ३५ महिलांचा सन्मान सोहळा व तालुकास्तरीय महिला मेळावा संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या विभागीय अध्यक्षा तथा दहिवद येथील माजी लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील या होत्या. तर या सन्मान सोहळ्याला खा. स्मिता वाघ,माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील,नासिक मनपाच्या नगरसेविका विमल रमेश पाटील,चोपडा उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.निलीमा देशमुख,एकात्मिक बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील,शहापूर सरपंच सुमनबाई पाटील, अॅड.ललीता पाटील,वसुंधरा लांडगे,दर्शना पवार,गटविकास अधिकारी एन.आर.पाटील,मारवड पो.स्टे.चे एपीआय जिभाऊ पाटील,युवा उद्योजक रविंद्र पाटील,योगेश पाटील,नगरसेवक प्रविण पाटील यांची उपस्थिती होती. प्रवीण पाटील यांनी उपस्थित महिलांना पुस्तके भेट दिली.शहापूर पंचक्रोशीतील महिलांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.




