
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवला. चित्रपट पाहून विद्यार्थी भावनिक झाले.

छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास उलगडला आहे. त्यातील अभिनयाने चित्रपटात अधिक जिवंतपणा आल्याने साक्षात इतिहासाचे आपण साक्षीदार होऊन चित्रपटात विद्यार्थी रमले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान विद्यार्थी खूप भावुक झाले होते. हा चित्रपट दाखवण्यासाठी सिनेप्लेक्सचे मॅनेजर नरेंद्र मराठे व उद्योगपती सरजू गोकलानी यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.




