
अमळनेर : धावणाऱ्या मोटरसायकलने अचानक पेट घेतल्याची घटना १४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

जिल्हापरिषदेचे माजी सदस्य संदीप पाटील हे हळदीच्या कार्यक्रमाला आपली मोटरसायकल क्रमांक एम एच १९ ए डब्ल्यू ४०४६ वर बहिणीला घेऊन जात असताना सम्राट हॉटेल जवळ अचानक मोटरसायकलमधून धूर निघू लागल्याने संदीप पाटील खाली उतरले आणि दूर झाले तोपर्यंत मोटरसायकलने पेट घेऊन पूर्णपणे खाक झाली.