
पाण्याचा अपव्यय टाळून केला नैसर्गिक रंगांचा वापर, लोकप्रतिनिधीचाही सहभाग
अमळनेर :-येथील ग्रीन ग्रुप, अमळनेर आयोजित रंगोत्सव २०२५ “चला उधळूया मैत्रीचे रंग” या धुलिवंदन कार्यक्रमात सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संगीत व वांजत्रीच्या तालावर तरुणांसह जेष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींनी मोठी धम्माल केली.

यावेळी पाण्यासह अपव्यय व पक्के रंग टाळत नैसर्गिक रंगाची उधळण करण्यात आली. सकाळी ठीक 10.30 वाजेपासून तहसील कचेरीच्या भव्य प्रांगणात कार्यक्रमास सुरुवात झाली याठिकाणी भव्य शामियाना टाकून प्रचंड सजावट करण्यात आली होती. याठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ, अनिल शिंदे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून DJ च्या तालावर ठेका धरत रंगाची उधळण केली.
ग्रीन ग्रुप,अमळनेर चे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.राजकीय व सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मित्र परिवाराचा हा ग्रुप असून अनेक सामाजिक कार्यात हा ग्रुप सक्रिय असतो. यानिमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी व विविध समाज बांधवांना या ग्रुपने एकत्रित आणल्याने अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी आ अनिल पाटील,खा स्मिताताई वाघ,माजी आ साहेबराव पाटील,सौ जयश्री पाटील,डॉ अनिल शिंदे, शरद शिंदे यासह अनेकांचे सहकार्य लाभले.