
अमळनेर : पिशवीला छिद्र पाडून ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना १८ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता सेंट्रल बँकेत घडली.

आनंदा भगवान पाटील वय ७६ रा सोनखेडी हे १८ रोजी सकाळी सेंट्रल बँकेत ३५ हजार रुपये काढायला गेले. पैसे काढून त्यांनी पिशवीत ठेवले आणि पुन्हा पासबुक भरायला बँकेत गेले व पासबुक भरून पुन्हा पिशवीत ठेवायला गेले असता पिशवीला छिद्र पडलेले दिसले. पिशवीतील ३५ हजार पैकी ३० हजार गायब होते. पिशवीत फक्त ५ हजार शिल्लक होते. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




