
अमळनेर:- भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा पुणे 2024 -2025 आयोजित स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मारवड येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन करत सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरावर मजल मारली आहे.

इयत्ता पहिली प्रथम क्रमांक कुमारी प्रेक्षा प्रशांत साळुंखे, द्वितीय क्रमांक नूतन चेतन चव्हाण, तृतीय क्रमांक कु. स्वरा शेखर पाटील, इयत्ता दुसरी द्वितीय क्रमांक मनस्वी किशोर पाटील तृतीय क्रमांक फाल्गुनी नामदेव पाटील इयत्ता तिसरी चतुर्थ क्रमांक दिव्यानी समाधान शिंदे इयत्ता चौथी द्वितीय क्रमांक प्रज्ञा दिग्विजय साळुंखे तृतीय क्रमांक रुष्वी अरुणकुमार साळुंखे या विद्यार्थीनींनी स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळविले. या परीक्षेत शाळेतून एकूण 31 विद्यार्थ्यांनी बसले होते. या विद्यार्थ्यांना श्रीमती. मनीषा निकम, श्रीमती. शारदा जाधव, दिनेश मोरे व सुदीप साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
पळासखेडे बु. जि.प.शाळेचे भारत टॅलेंट सर्च परिक्षेत घवघवीत यश

भारत टॅलेंट सर्च परिक्षेत पळासखेडे बु.येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इ.२ री तील विद्यार्थिनी समिक्षा विलास पाटील हिने अमळनेर केंद्रातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. इ.३ रीतील हरीप्रिया राजेंद्र मराठे , खुशी अशोक मराठे व किर्ती दत्तात्रय मराठे या विद्यार्थिनींनी अमळनेर केंद्रातून अनुक्रमे प्रथम , द्वितिय व तृतिय क्रमांक मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक शरद भोई सर यांचे मार्गदर्शन लाभले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.




