
अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आलेल्या १३ वाहनांचा जाहीरनामा पोलिस प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे.

विविध प्रकरणात पकडण्यात आलेली ही १३ वाहने बेवारस पद्धतीने पोलिस स्टेशन आवारात पडलेली असून त्यांचा लिलाव करण्याआधी मूळ मालकांना त्या वाहनांची माहिती कळावी यासाठी हा जाहीरनामा काढण्यात आलेला आहे.त्या वाहनांच्या मूळ मालकांचा अनेकदा शोध घेतला मात्र ते प्रशासनाला मिळून आले नाहीत.
७ मार्च रोजी पोलिस अधीक्षक यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून याची माहिती दिली.जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वाहनांची मूळ कागदपत्रे दाखविल्यास त्या वाहनाचा ताबा मालकांना देण्यात येईल.
बेवारस स्थितीतील खालील वाहने
१)बजाज पल्सर (जी.जे.२१ बीपी १३३४)
२)हिरो स्पेलंडर एनएक्सजी (एम एच १९ डी वाय ०४१२)
३)हिरो पॅशन प्रो (एम एच १९ बी एच ३७४१)
४)हिरो एच एफ डिलक्स (एम पी १० एम जी ४४०८)
५)बजाज (एम एच १९ सी सी ५७४७)
६) बजाज डिस्कवर (एम एच १२ एफ टी ६१७२)
७)टीव्हीएस (जी जे ०५ डी पी ६५७५)
८) टीव्हीएस (एम एच १८ एक्स ६३३६),
तर विना नंबरच्या
९)यामाहा कंपनीची एफ झेड भगव्या रंगाची
१०)बजाज सी टी १००
११)लाल रंगाची बजाज फोर एस
१२)हिरो स्पेलंडर
१३)बजाज प्लॅटिना या वाहनाचा लिलाव होणार आहे.




