
अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…
अमळनेर : खेलो इंडियाच्या पॅरा गेम स्पर्धेत वेट लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेर येथील दिव्यांग खेळाडू दिनेश बागडे याने सुवर्णपदक पटकावत अमळनेर च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नवी दिल्ली येथे २० ते २७ दरम्यान खेलो इंडियाचे पॅरा गेम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण १३०० विविध प्रकारचे खेळाचे खेळाडू सहभागी झाले होते. १०७ किलो वजनाच्या गटात अंतिम फेरीत सात स्पर्धक होते. दिनेश ने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दिनेशने गेल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न त्याने प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण केले आहे. दिनेश च्या विजयाने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्याच्या यशाबद्दल अमळनेर तालुका क्रीडा संघटना ,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि कंजर भाट समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
दिनेश बागडे हा संपूर्ण अमळनेर सह मसल्स फॅक्टरी जिमचा अभिमान असून व्यसनाधीन तरुणांनी त्याचा आदर्श घेणे गरजेचे आहे. दिनेश हा आजच्या तरुणाईसाठी खराखुरा आयकॉन आहे. :- किशोर महाजन, प्रशिक्षक




