
शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये बाजार समितीचे आवाहन…
अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समिती २७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीला आणू नये असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

२७ मार्च रोजी धारक मापाडी कै .तुकाराम गबा भोई यांच्या निधना निमित्त व व्यापारी असोसिएशन यांनी दिलेल्या पत्रानुसार वर्ष अखेरचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी २८ मार्च ते १ एप्रिल अखेरपर्यंत व्यापारी बांधव शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार नाहीत. २९ रोजी शनिवार व ३० रोजी रविवार असल्याने तसेच बाजार समितीस सोमवार दि.३१ रोजी “रमजान ईद” निमित्त सुट्टी असून मंगळवार दि.१/४/२०२५ रोजी “बँकांचे आर्थिक व्यवहार बंद” राहतील म्हणून शेतकरी बांधवांनी गुरूवार २७ मार्च मंगळवार ते १ एप्रिल अखेर शेतमाल विक्रीस आणू नये,याची नोंद घ्यावी. असे आवाहन बाजार समितीतर्फे सभापती अशोक पाटील व सचिव डॉ उन्मेष राठोड यांनी केले आहे.




