
अमळनेर – येथील एका दलित तरुणीवर रत्नाकर सुभाष पाटील (वय-३०) याने लग्नाचे आमिष देऊन दोन वर्ष बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

विवाहित पीडितेला रत्नाकर याने पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडले. तद्नंतर लग्नाचे आमिष देऊन सलग दोन वर्ष अत्याचार केला. परंतु, पीडितेने लग्नाची गळ घातल्यावर रत्नाकर याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिले. पीडितेशी लग्न न करता पीडितेच्याच मोठ्या बहिणीसोबत संसार थाटला. पीडितेची मोठी बहीण हि रत्नाकरच्याच मित्राची कायदेशीर लग्नाची पत्नी असून तिचा घटस्फोट देखील अद्याप झालेला नाही.तरीदेखील रत्नाकर याने पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न उरकून टाकले.या प्रकरणी आरोपी रत्नाकर फरार असून अटकपूर्व जामिनासाठी आरोपीने मा. उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पिडीतेकडून रत्नाकर याच्याकडून वारंवार तक्रार मागे घेण्याबाबत धमक्या येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यांनतर दिनांक २४ रोजी न्या. शैलेश ब्रम्हे यांच्या न्यायपीठाने आरोपी रत्नाकर याचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला आहे. पीडितेच्या वतीने ॲड. भूषण महाजन यांनी युक्तिवाद केला.




