
अमळनेर :- डांगरी ता. अमळनेर येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे लोकमान्य पॅनलचे प्रमुख अनिल शिसोदे आणि महेंद्र बोरसे यांच्या पॅनलने सर्व जागांवर विजयी मिळवून दणदणीत विजय स़ंपादन केला तर दिनेश सिसोदे आणि उदय शिसोदे यांच्या पॅनलचा पराभव झाला. डांगरी, सात्री आणि कलाली ह्या तिघे गावे वि.का. सह. सोसायटीचे कार्यक्षेत्र आहे.

यात सर्व साधारण जागेसाठी महारु गजमल बडगुजर, धनराज दामू बडगुजर, नंदकिशोर सोपान निकम, भगवान सीताराम पाटील, भानुदास उत्तम पाटील, प्रदीप रामराव पाटील, रविंद्र नथु पाटील, सुधाकर बाजीराव शिसोदे, तर महिला मतदार संघ मध्ये संध्याबाई पाटील , उज्वला पाटील तर ओबीसी मतदार संघात सुनील शिवदास शिसोदे, भटक्या जाती विमुक्त जाती मतदार संघात पोपट सुका भोई, अनुसूचित जाती, जमाती मतदार संघ मध्ये प्रताप भगवान शिरसाठ हे लोकमान्य पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले. महेंद्र बोरसे, अनिल शिसोदे, लोटन पाटील, महारू शिसोदे, पुंजू शिसोदे,अनंतराव शिसोदे, जयवंत शिसोदे,वाल्मीक शिसोदे, रामचंद्र पाटील यांनी पॅनल विजया साठी परिश्रम घेत राष्ट्रवादी लोकमान्य पॅनलच्या सर्व जागा निवडून आणल्या.




