
अमळनेर : महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक विकास योजनेंतर्गत ५५ शहरांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे त्यात अमळनेर शहराच्या जुनी हद्द व नवीन हद्द वाढ सह प्रारूप सुधारित विकास आराखड्याचा समावेश आहे.

अमळनेर शहराचा झपाट्याने विस्तार वाढत आहे. आमदार अनिल पाटील यांनी मंत्रिपदाचा लाभ उठवत भरपूर विकास कामे केली असली तरी शहराबाहेर विकास कामे करताना अडचणी येतात. शहराची हद्द वाढ होणे आवश्यक आहे. म्हणून आमदार पाटील यांनी अधिवेशनात जुनी हद्द आणि नवीन हद्द वाढ सह विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला. ५५ शहरांच्या विकास आराखड्यात जळगाव जिल्ह्यातील तीन गावांसह अमळनेर शहराचा समावेश आहे.
प्रतिक्रिया…
अमळनेर शहर चहूबाजूने वाढत असून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास व विकास करण्यास अडचणी निर्माण होतात म्हणून शहर हद्द वाढ करण्याचा प्रस्ताव सुरू आहे.- तुषार नेरकर,मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद




