
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामपंचायतीमार्फत मागासवर्गीयांच्या 20% राखीव निधी मधून सन 2024/ 25 या वर्षातील निधीमधून सुमारे 70 ते 75 हजार रुपये किमतीचे समाज उपयोगी भांड्यांचे तसेच खुर्च्यांचे वाटप सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, लताबाई मंगल भिल, प्रमिलाबाई रमेश चौधरी तसेच किशोर निकम, भागवत निकम, कैलास चव्हाण, नगराज पारधी, प्रमोद निकम, किसनसिंग पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असतात त्याच्य अनुषंगाने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मागासवर्गीय बांधवांना भांड्यांचे तसेच खुर्च्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. दरवर्षी यापुढे देखील ग्रामपंचायत मार्फत असेच उपक्रम राबविले जातील असे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटूभाऊ राजपूत यांनी यावेळी सांगितले.




