
अमळनेर:- येथील अहिराणी साहित्य संमेलनातील दिनांक ३० मार्च (गुढीपाडवा) रोजी येथे संपन्न झालेल्या ग्रंथ दिंडीत जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे ३५० मान्यवरांना उन्हाची तीव्रता पहाता थंड मसाला ताक पाउच वाटप करण्यात आले , त्यामुळे काही प्रमाणात सहभागी व्यक्तीची तृष्णा तृप्ती झाली,मुख्य आयोजक प्रा लिलाधर पाटील यांच्या तर्फे जायंट्स ग्रूप चे आभार मानण्यात आले ,याप्रसंगी उपस्थित जायंट्स संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र भावसार , सेक्रेटरी संदीप महाजन , सदस्य रविंद्र पाटील, महेश पाटील, आश्विन पाटील , प्रदीप शिंगाणे , मार्गदर्शक ॲड राजेंद्र चौधरी, चंदुलाल बडगुजर,पी आर भावसार,रमेश महाजन हे उपस्थित होते.




