
अमळनेर :- चोपडाई कोंडावळ गावाजवळील पुलाच्या लोखंडी रेलिंग तुटल्याने अनेक अपघात होत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी करीत आहे.
१० रोजी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांचा इको गाडीचा अपघात झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.तरी लवकरात लवकर पुलावरील लोखंडी रेलिंग दुरुस्ती करण्यात यावी ही मागणी चोपडाई कोंडावळ येथील ग्रामस्थानी केली आहे




