
जैन समाजाच्या या वास्तूचे भगवान महावीर भवन नामकरण करावे-आ.अनिल पाटील
अमळनेर-शहरातील सिटी सर्वे नंबर 32/23 मधील भांडारकर कंपाऊंड येथे नगरपरिषदेच्या भूखंडावर जैन समाजाचे भव्य सांस्कृतिक भवन उभे राहिल्याने महावीर जयंतीच्या दिवशी थाटात याचे लोकार्पण माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते होऊन जैन समाजाला अनोखी भेट मिळाली.
जैन समाजाच्या या वास्तूचे भगवान महावीर भवन नामकरण करावे अशी अपेक्षा आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केली.आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले की अमळनेर शहरात सकल जैन समाजाच्या अनेक पिढ्यांसाठी हे भवन उपयोगात येणार असुन माझ्या माध्यमातून हे पवित्र काम झाल्याने मला आनंद आहे.याठिकाणी अजून उद्यान किंवा इतर ज्या काही सुविधा देता येतील ते देण्याचा नक्की प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.त्यांचा समाजातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. सुरवातीला प्रास्तविकात महावीर पहाडे यांनी आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून 55 लक्ष सरकारी निधीतून अमळनेर शहरातील जैन समाजाची ही पहिली वास्तू असून अनिल दादांनी स्वतः याची फाईल हाताळून संपूर्ण तांत्रिक अडचणी दूर केल्याने आज ही जैन समाजाची मोठी वास्तू उभी राहिली आहे. यासाठी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री पाटील यांनीही आपुलकीने मदत केली तसेच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून हा भूखंड उपलब्ध करून दिला होता यामुळे या सर्वांचा जैन समाज कायमस्वरूपी ऋणी राहील असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी भेट देऊन समाजबांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात.
सूत्रसंचालन सौ वैशाली पहाडे यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री पाटील,घेवरचंद कोठारी, महेंद्रलाल कोठारी,भिकचंद खिवसरा,डॉ किशोर शहा,संजय गोलेच्छा,राजेंद्र बेदमुथा,डॉ रविंद्र जैन,सचिन चोपडा,यासह सकल जैन समाजातील महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वानी आमदार पाटील यांच्या या कार्याचे कौतुक करत जाहीर आभार व्यक्त केले.

