
अमळनेर – शहरातील हॉटेल पूनम शेजारी लावलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार अमळनेर पोलिसांनी मोटरसायकल चोरास मुद्देमाल सह अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महेंद्र धनसिंग पाटील यांची ३५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्या घटनेच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हिरालाल छोटू पाटील रा.झाडी ता.अमळनेर यास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर,हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे,गणेश पाटील,राजेंद्र देशमाने,उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव, अमोल पाटील,प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे उदय बोरसे आदींच्या पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता.त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.




