
अमळनेर:- येथील रहिवासी व विटनेर ता.चोपडा येथील,सुपुत्र राष्ट्रीय कथाकार महंत प्रा. डॉ.सुशील महाराज,विटनेरकर यांना नुकतेच राजधानी दिल्ली येथे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या विद्यापीठामार्फत विद्या वाचस्पती(डॉक्टरेट)पदवी प्रदान करण्यात आली.पदवि प्रदान सोहळ्यात सुशील महाराजांनी वारकरी वेष परिधान करूनच ही सर्वोच्च पदवी स्विकारल्याने अध्यात्म व विज्ञान एका व्यासपीठावर बघून सर्वसामान्य वारकऱ्यांच्या मनात महाराजांविषयी सर्वत्र कौतुक होत आहे, सुशील महाराज यांनी ही पीएचडी पदवी औषधंनिर्माणशास्त्रातील फार्मास्यूटिकल रिसर्च मध्ये प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी संपादन केली,त्यांना डॉ.ए.बी. पॉलकॅमेरोन यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी अगोदर बी.फार्म व एम.फार्म ही पदवी आर सी पटेल कॉलेज ऑफ फार्मसी, शिरपूर येथून प्राप्त केली,एम.फ़ार्मसीत त्यांना क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मार्फत विद्यापीठातील प्रथम क्रमांक तथा सुवर्णपदक(गोल्ड मेडल) प्राप्त झाले होते,सध्या ते नंदुरबार येथील जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे,
तरी हा माझा सन्मान नसून सर्वसामान्य वारकऱ्यांचा व माझ्या मातापित्यांचा सन्मान आहे असा आत्मविश्वास डॉ.सुशील महाराज यांनी बोलून दाखवला,त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.




