
अमळनेर:- जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे जिल्हा परिषद शाळा जळोद येथे 200 विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासण्यात आले. विशेष म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा शाळेत 228 पैकी 200 विद्यार्थी यांनी शाळेवर येऊन रक्तगट तपासणी करून घेतली.
जिल्हा परिषदेची ही शाळा जिल्ह्यात क्रमांक दोन ची शाळा ठरलेली असून यांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपयाचा धनादेश सुद्धा या शाळेत देण्यात आलेला आहे.
या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन तसेच जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर चे संस्थापक अध्यक्ष,तथा श्री गणेश लॅबचे संचालक डॉक्टर सुनील पाटील यांनी या शिबिरात सर्व रक्तगट मोफत तपासणी करून दिले.
यावेळी सचिव जायंट्स संदीप महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, मार्गदर्शक जायंट्स प्रवीण भावसार सर, ॲड राजेंद्र चौधरी, रमेश महाजन , अश्विन पाटील, प्रदीप शिंगाणे, रवींद्र पाटील या सदस्यांनी या कामात सहकार्य करून उपक्रम यशस्वी केला. विद्यार्थ्यांना शिस्तीत रक्तगट तपासणीसाठी आणून त्या शाळेतील ज्ञानेश्वर भाईदास कुवर (मुख्याध्यापक) शिक्षक सुनिल श्रावण पाटील, नरेश आत्माराम शिरसाठ , सदाशिव पौलाद पवार , सुरेखा यशवंत पाटील, जयश्री दिलीप पवार,कल्पना प्रकाश पवार, यांनी अनमोल सहकार्य करून रक्तगट शिबिराचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर च्या वतीने या सर्व शिक्षकांचे तसेच शालेय स्थानिक समिती अध्यक्ष सतीलाल भोई व दीपक चौधरी यांचे ही आभार मानण्यात आले.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कुवर सर व शिक्षकवृंद सरपंच कल्पना ज्ञानेश्वर चौधरी यांच्याकडून जायंट्स सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच पाहुणचार म्हणून सकाळचा अल्पोपहार, व दुपारचे जेवण ही या निसर्गरम्य परिसरात देण्यात आले, जायंट्स सदस्यांनी त्यांच्या मेजवानी बद्दल आभार मानलेत. याच शाळे वरती “पक्षांशी संवाद” या विषयावरील प्रोजेक्टरच्या सहाय्याने स्लाईड शो लवकरच घेण्यात येणार आहे.




