
अमळनेर:- तालुक्यातील आटाळे येथील शत्रुघ्न गजमल पाटील आणि भरत गजमल पाटील यांच्या शेतातील गहू आणि मका च्या पिकाला मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने दोन्ही भावांचे सुमारे 7 बिघे गहू आणि मका जळून खाक झाला अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने सायंकाळी 5 वाजे पर्यंत आग आटोक्यात आणली याबाबत अधिक माहिती अशी की, शत्रुघ्न गजमल पाटील आणि भरत गजमल पाटील यांच्या शेतात दीड बिघे गहू साडे पाच बिघे मकाची लागवड करण्यात आली होती, गहू आणि मक्याचे पीक जोरदार होते, भरघोस उत्पन्न येणार म्हणून दोन्ही भाऊ आनंदी होते मात्र मंगळवारी दुपारी 4 वाजता शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून शेतातील पिकाला आग लागली , तात्काळ सरपंच आणि स्वतः शेतकऱ्यांनी अग्निशमन विभागाला कळविले मात्र शेतात यायला रस्ता व्यवस्थित नसल्याने गाडी शेतात पोहचायला उशीर झाला अग्निशमन गाडी आल्याने नंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र बंबतील पाणी संपल्याने अमळनेर येण्याजाण्यात वेळ गेला असता म्हणून शेजारच्या विहिरीवरून अग्निशमन बंबात पाणी भरून आग विझवण्यात आली शेजारच्या शेतात असणाऱ्या मका पिकाला देखील याची झळ बसली असती मात्र शेतातील आदिवासी समाजाच्या महिलांनी त्या शेताला आगी च स्पर्श। होऊ दिला नाही,सायंकाळी 5 वाजेपर्यंत आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आले मात्र तोपर्यंत पाटील बंधूचा शेतातील पिकाची राख झाली होती, दरम्यान नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल चे पथक बुधवारी येणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले




