
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २१ एप्रिल रोजी शहरातील इंदिरा गांधी भवन येथे दुपारी ३.३० वाजता काढण्यात येणार आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की,११ एप्रिल रोजी च्या अधिसूचनेनुसार तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीतिल अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदांमधून महिलांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.राजकीय पक्षाच्या पदाधिकारी तसेच सरपंच,उपसरपंच यांनी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

