
अमळनेर:- तालुका विधी सेवा समिती आणि वकिल संघाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाडसे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विधी सेवांतर्गत (मोबाईल व्हॅन) कायदेविषयक जनजागृती शिबिर झाले. या शिबिरास विविध कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी व्यासपीठावर दिवानी न्यायाधीश प्रवीण देशपांडे यांनी नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आणि समाजातील महिलांची सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. सह दिवानी न्यायाधीश नीलेश यलमाने यांनी बाल कामगार व बालकांची तस्करी यावर मार्गदर्शन केले. वकिल संघाचे सदस्य ॲड. राजेंद्र निकम यांनी विवाह संबंधी प्रकरणात तडजोड आणि पिडीता नुकसान भरपाई योजनावर मार्गदर्शन केले. ॲड. किशोर बागुल यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले.ॲड. किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन करून बाल विवाह प्रतिबंध कायदा आणि सार्वजनिक सेवा या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे शरद दयाराम शिंदे, ऍड चिंतामण पाटील, माजी सरपंच गोपीचंद कोळी वकील संघांचे अध्यक्ष ॲड. किरण पाटील,सह मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




