
आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून होणार कायापालट
अमळनेर-येथील वर्णेश्वर महादेव मंदिरावर रविवार दिनांक 20 रोजी सकाळी 9.30 वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी चोपडा रोड पासून मंदिरापर्यंत रस्ता, भक्तनिवास हॉल, तलावाचे सुशोभीकरण, कंपाउंड वॉल इत्यादी कामांचे भूमिपूजन होणार आहे. सदर कार्यक्रम खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.याशिवाय अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वानी उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष व ट्रस्टी श्री वरणेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.