
अमळनेर: शहरातील अर्बन बँकेसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या सट्टा जुगारावर पोलिसांनी धाड टाकून तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील , अमोल पाटील , जितेंद्र निकुंभे , हर्षल पाटील यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून १९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अर्बन बँकेसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये सट्टा जुगार खेळणाऱ्या जिजाबराव भिका पाटील रा तांबेपुरा , विकी सुंदरदास बठेजा रा सिंधी कॉलनी , संतोष मधुकर बनसोडे रा गांधलीपुरा या तिघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील सट्टा जुगाराची साधने व १२६० रुपये रोख असे जप्त करून जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये जुगार सुरू असेल तर अशी दुकाने जप्त करण्याची मागणी होत आहे.




