
गोदावरी फाऊंडेशन जळगाव ची टीम होणार दाखल
अमळनेर -येथील श्री सद्गुरु संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान यांच्यातर्फे आणि गोदावरी फाऊंडेशन,जळगाव यांच्या वतीने मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन आज रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत वाडी संस्थानात करण्यात आले आहे.

संत सखाराम महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हे शिबिर होत असून गरीब व गरजू नागरिकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सदर शिबिरात मुतखडा,मूत्रपिंडातील खडे,प्रोस्टेट,पित्ताशय खडे,स्वादु पिंड, छोट्या गाठी, मूळव्याध, हायड्रोरील, अंडाशय, शस्त्रक्रिया, भगंदर,पित्ताशयाचे खडे,पायातील शिरा फुटणे,मूत्रपिंडाचे आजार,पोट व आतड्याच्या शस्त्रक्रिया तसेच कर्करोग,बालरोग शस्त्रक्रिया,मेंदू मणका,नाक कान घसा,नेत्ररोग,हृदय रोग, गर्भपिशवी, अस्थीरोग,मानसोपचार तसेच मोफत अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया आदी आजारांवर उपचार करण्यात येणार आहे.मोफत ईसीजी व कार्डीओग्राफ काढण्यात येणार आहे.रुग्णांनी सोबत येताना ओरिनजनल आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

रोटरी व लायन्स तर्फेही शिबीर
याच दिवशी अमळनेर रोटरी क्लब आणि लायन्स क्लब तसेच अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या सहकार्याने देखील वाडी संस्थान येथे मोफत रोग निदान शिबिर सायंकाळी 5 वाजेपासून होणार आहे.या शिबिरात शहरातील तज्ञ व नामवंत डॉक्टर्स तपासणी करणार आहेत, यात डॉ. सौ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. अविनाश जोशी, डॉ.अनिल शिंदे, डॉ.निखिल बहुगुणे, डॉ.किरण बडगुजर, डॉ.विक्रांत पाटील, डॉ.भूषण पाटील, डॉ.अक्षय कुलकर्णी, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ.संदेश गुजराथी, डॉ.नरेंद्र सोनवणे, डॉ.संदीप जोशी, डॉ.रवींद्र कुळकर्णी, डॉ.मिलिंद नवसारीकर, डॉ. सुमित सूर्यवंशी, डॉ.शरद बाविस्कर, डॉ.रवींद्र जैन डॉ.शिरीष उपासनी, डॉ.अनिल वाणी, डॉ.संजीव चव्हाण, डॉ. निलेश जैन, डॉ.दिनेश महाजन, डॉ.किशोर शहा, डॉ. तुषार जोगी, डॉ.शशांक जोशी, डॉ.निलेश जैन, डॉ.अशोक जोशी, डॉ.विजय महाजन, डॉ. पी. जी. पिंगळे, डॉ.राजेंद्र पिंगळे डॉ. अनिल वाणी, डॉ. केदार कुलकर्णी, डॉ. शिरीष उपासनी, डॉ. अशोक जोशी डॉ. यज्ञेश कुलकर्णी, डॉ. रविंद्र जैन, डॉ. विजय महाजन,डॉ राजेंद्र पिंगळे,डॉ संदेश गुजराथी आदी डॉक्टर तपासणी करणार आहेत.
या शिबिरात दंत तपासणी डॉ.विशाल शंशाक जोशी, डॉ.प्रीतम जैन, डॉ.सौरभ जैन, डॉ. अभिषेक भट हे करणार आहेत. धर्मार्थ दवाखान्यात डॉ. महेश रमण पाटील, डॉ.अपर्णा मुठे, डॉ.राजीव शाह, डॉ.मनीषा लाठी आणि नेत्र तपासणी डॉ.राहुल मुठे, डॉ.सौ.बीराज मुठे, डॉ.कौस्तुभ वानखडे, डॉ.नरेंद्र महाजन, डॉ. अमोघ जोशी करणार आहेत.लायन्स क्लबतर्फे सायंकाळी 5 ते 7 मधुमेह व रक्तातील साखर तपासणी डॉ.मिलिंद नवसारीकर करणार असून जीवनश्री ब्लड बँक व जायन्टंस गृपतर्फे सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 5 ते 7 यावेळेत रक्तदान शिबिर होईल.
तरी या शिबिराचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंडळ तसेच सद्गुरु सखाराम महाराज संस्थान अमळनेर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी शशांक जोशी 9422278785, 9922473742 यावर संपर्क साधावा.





