
अमळनेर:- रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे दि. ९ मे २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी क्लबच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवत गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. हा उपक्रम डिस्ट्रिक्ट ग्रँट अंतर्गत यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली, विशेष म्हणजे हा केक क्लबचे अध्यक्ष आणि उपस्थितांमधील एका लहानग्याच्या हस्ते कापण्यात आला. या भावनिक आणि आनंददायी क्षणाला व्यासपीठावर उपस्थित जेष्ठ सदस्य साक्षीदार होते.

या उपक्रमांतर्गत एकूण १८ सायकली गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. या सायकली शाळेपर्यंत प्रवास सुलभ करण्यासाठी दिल्या गेल्या असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. सायकल प्रकल्पात रो. ताहा बुकवाला, रो. सुहास राणे, रो. विजय माहेश्वरी, रो. अभिजीत भांडारकर, रो. विजय पाटील, रो. वृषभ पारख, रो. विनोद भैय्यासाहेब पाटील,रो. धीरज अग्रवाल, रो. परयांक पटेल या क्लबच्या जेष्ठ सदस्यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली.

कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रेक्षकांना रोटरी म्हणजे काय, रोटरी सदस्य समाजासाठी कोणत्या सेवा देतात, याविषयी माहिती देण्यात आली. रोटरी हे केवळ एक क्लब नसून, एक सामाजिक बांधिलकीची भावना जपणारी चळवळ आहे, याची प्रचिती उपस्थितांना आली, आलेल्या मुलांनी मनोगत मांडली व त्यांनी रोटरी क्लब चे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी रो.रोहित सिंघवी,रो.देवेंद्र कोठारी ,रो.आशिष चौधरी ,रो.दिलीप भावसार सर, रो. प्रदीप पारख,रो.चेलाराम सेनानी रो.महेश पाटील,रो.कीर्ती कुमार कोठारी,रो डॉ अनिल वाणी, रो.डॉ.राहुल मुठ्ठे, रो. पुनम कोचर, रो. राजेश जैन, रो. दिनेश रेजा उपस्थित होते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.अभिजीत भांडारकर यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

